जळगाव शहरात एक दिवस उशिराने पाणी पुरवठा

 

 

जळगाव (प्रतिनिधी ) शहराला  वाघुर योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. वाघुर येथून जलवाहिनीवरील  विमानतळ (हॉटेल साईजवळ ) मुख्य वाहिनीवरील एअर व्हाल खराब झाला असल्याने त्याच्या दुरुस्तीस ८ तासांचा कालावधी लागणार असून सुप्रीम कॉलोनी परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी शहराचा ;पाणीपुरवठा एक दिवस उशिराने करण्यात येणार आहे. यात शहरत ४ एप्रिल  रोजी होणारा पाणी पुरवठा ५ तारखेला तर ५ चा ६ ला व ६ चा ७ तारखेला करण्यात येणार आहे. दरम्यान, गणेशवाडी परिसराचा पाणी पुरवठा गुरुवार ४ रोजी उशिराने करण्यात येणार आहे.

 

शुक्रवारी या भागात होईल पाणीपुरवठा 
नटराज टाकी ते चौघुले मळा, शनीपेठ, बळीरामपेठ, शनीपेठ, नविपेठ, हौसिंग सोसायटी, प्रतापनगर, गेंदालाल मिल, खडके चाळ, इंद्रप्रस्थ नगर, के.सी.पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड, भोईटे नगर, भिकमचंद जैन नगर, आकाशवाणी, जुनेगांव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, हेमुकलाणी टाकीवरील परिसर, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्‍वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रिम कॉलनी, डी.एस.पी. टाकीवरील तांबापुरा, गणपती नगर, आदर्श नगर, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉण्ड कॉलनी या भागात पाणीपुरवठा होणार आहे.

शनवारी या भागात होईल पाणीपुरवठा 
वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड, रामेश्‍वर कॉलनी, एम.डी.एस कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्‍सानगर, अयोध्यानगर, शांतिनिकेतन, गृहकुल कॉलनी, म्हाडा कॉलनी, अजिंठा सोसायटी, मोहननगर, नेहरूनगर, हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी, खोटेनगर, गेंदालाल मिल, शिवाजीनगर हुडको, प्रजापत नगर, एस.एम.आयटी परिसर, योगेश्‍वर नगर, हिरापाईप, शंकरराव नगर, खेडीगांव परिसर, तांबापुरा, शामाफायर, वाघनगर, हरिविठ्ठल नगर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर, जिल्हारोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, ऑफिसर क्‍लब.

रविवारी या भागात होईल पाणीपुरवठा 
खंडेराव नगर, पिंप्राळा गावठाण, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बॅंक कॉलनी, आशाबाबा नगर, मानराज टाकी परिसर, शिंदे नगर, अष्टभुजा, वाटीकाश्रम, निवृत्ती नगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी, नित्यानंदनगर, संभाजी नगर, रायसोनी नगर, समतानगर परिसर, सानेगुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, गिरणा टाकी आवारातील उंच टाकी, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी.

Add Comment

Protected Content