Competition : ‘रंगोत्सव 2022 ‘ रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे आज ‘रंगोत्सव – २०२२’ रंगभरण स्पर्धा दोन गटात उत्साहात संपन्न झाली.

कोरोना काळात विद्यार्थ्यांमधील कलागुण पुनरुज्जीवित करण्याच्या हेतूने पाचोरा तालुका सहकारी संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या संकल्पनेतून बुधवार, दि.२७ एप्रिल रोजी इयत्ता तिसरी ते पाचवी (लहान गट) व सहावी ते आठवी (मोठा गट) अशा दोन गटांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील तसेच शहरातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व खाजगी माध्यमिक विद्यालय तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळातील जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

स्पर्धा संपल्याबरोबर लगेचच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यात दोन्ही गटात प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशी बक्षिससह प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन विलास जोशी तर बक्षीस वितरण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.

 

गट अ – (इयत्ता – तिसरी री ते पाचवी)

 

तनुश्री सोम पुरकर  प्रथम)

जरुमिन पिंजारी (गिरड) ( द्वितीय) –

भूमिका जाधव, (वाणेगाव), (तृतीय )

धनश्री पाटील (उत्तेजनार्थ) (ओझर),

 

गट ब – (सहावी ते आठवी )

 

समीक्षा महाजन ( प्रथम),

आराध्या पाटील (द्वितीय),

ओम वाणी (तृतीय) (गो. से. हायस्कूल),

कस्तुरी चित्ते (उत्तेजनार्थ), (नवीन आदर्श प्राथमिक शाळा)

या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी व रोख रक्कम असे पुरस्कार देऊन विद्यार्थ्यांना पालकांसह सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी मंचावर पत्रकार लक्ष्मण (आबा) सूर्यवंशी, शाळेचे मुख्याध्यापक सुधिर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. ठाकरे , ए. बी. अहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी, उपप्रमुख आर. बी. बोरसे, तांत्रिक विभाग प्रमुख  एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर हे उपस्थित होते.

यावेळी परीक्षक म्हणून कलाशिक्षक एम. एन. पाटील, ए. डी. पाटील, पी. एस. सोनवणे, ए. बी. पाटील यांनी कामकाज पाहिले. गो. से. हायस्कूलचे कलाशिक्षक एस. डी. भिवसने, सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, ज्योती पाटील यांनी स्पर्धेचे नियोजन केले. तसेच सर्व शिक्षक – शिक्षकेतर बंधू – भगिनींनी स्पर्धा संपन्न होण्यासाठी परिश्रम घेतले.

 

 

Protected Content