‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा ; तरुणीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

 

Aamulya1

 

बंगळुरू (वृत्तसंस्था) बंगळुरूमध्ये नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात आयोजित करण्यात आलेल्या सभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या तरुणीचे नाव अमूल्या लियोना असे आहे.

 

पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या अमूल्याला गुरूवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आमूल्याला गुरूवारी न्यायालयात हजर केलं. कोर्टानं तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपल्या व्यासपीठावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याबद्दल ओवीसी यांनी खेद आणि निंदा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मी नमाज पठण करायला जाताना ही घोषणाबाजी झाली. मी तात्काळ ती थांबवली. एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी मंचावर असताना अमूल्याने मंचावर दाखल होत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यामुळे क्षणभर असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत सभेचे आयोजकही गोंधळून गेले. यानंतर ओवेसी यांनी या घटनेची तत्काळ मंचावरूनच निंदा केली. ‘शत्रू देशाच्या पक्षात दिल्या जाणाऱ्या घोषणांचे समर्थन केले जाऊ शकत नाही. आम्ही याची निंदा करतो. घडले ते चुकीचेच होते’ असे म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी वेळीच परिस्थिती सावरली.

Protected Content