उघड्या घरातून महिलेची सोन्याची पोत व मोबाईल लांबविला

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील पवन नगर येथील महिलेचे घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याची पोत व मोबाईल असा एकूण ८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी १४ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, आशा सुनील सावकारे (वय-३५) रा. पवन नगर, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १४ एप्रिल रोजी रात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान त्यांचा घराचा दरवाजा उघडा घेऊन महिला घरात झोपल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरात घुसून महिलेची सोन्याची पोत आणि मोबाईल असा एकूण ८ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार उघड केला आल्यानंतर महिलेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आपल्या चोरट्यांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात १४ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बापू कोळी करीत आहे.

Protected Content