तरूणावर जीवघेणा हल्ला करण्याच्या प्रयत्न ।; दोघांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ओक मंगल कार्यालयाजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून भाजीपाला विक्री करणाऱ्या तरूणावर लोखंडी कोयत्याने वार करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन संशयितांना शनीपेठ पोलीसांनी रविवारी ३१ मार्च रोजी सायकाळी ५.३० वाजता ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्ही दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील प्रजापत नगरात गोविंद राजेंद्र चौधरी वय ३३ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. भाजीपाला विक्री करून तो आपला उदरनिर्वाह करतो. ओक मंगल कार्यालयाजवळ गोविंद हा उभा असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून विवेक अशोक मराठे वय २५ आणि निर्भय उर्फ गोट्या पाटील वय ३२ दोन्ही रा. बळीराम पेठ, जळगाव यांनी लोखंडी कोयत्याने तरूणावर वार करण्याच्या उद्देशाने आले होते. ही बाब शनीपेठ पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे राहुल घेटे, रवी पाटील, मुकुंद गंगावणे, राहुल पाटील, अनिल कांबळे, नवजीत चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत रविवारी ३१ मार्च रोजी सायकाळी ५.३० वाजता दोघांना ताब्यात घेतले. यामुळे पुढील घटना टळली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुबारक तडवी हे करीत आहे.

Protected Content