घरासमोरून तरूणाची दुचाकी लांबविली

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील वामन नगर येथून तरूणाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी ३० मार्च रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी रविवारी ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन कौतिकराव पवार वय ३२ रा. नांदगाव जि.नाशिक हे आपल्या परिवारासह चाळीसगाव शहरातील वामन नगर येथे वास्तव्याला आहे. २९ मार्च रोजी त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक एमएच ४१ एव्ही ४६ ही घराच्या पोर्च येथे पार्कींगला लावलेली होती. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. ही घटना दुसऱ्या दिवशी ३० मार्च रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी रविवारी ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अजय पाटील हे करीत आहे.

Protected Content