जळगावात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची गळफास घेवून आत्महत्त्या

death penalty hanging

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाल्मिक नगरातील तीस वर्षीय तरूण आणि एकनाथ नगरातील 28 वर्षीय तरूण यांनी वेगवेगळ्या दोन घटनेत घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली असून याबाबत शनीपेठ आणि एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत वाल्मिक नगरात राहणारा किशोर ज्ञानेश्वर कोळी (वय-30) यांने राहत्या घरात कोणही नसतांना साडीने गळफास घेवून आत्महत्त्या केली. आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. पश्चात दोन वर्षाचा मुलगा, आई वडील असा परीवार आहे. याबाबत शनीपेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दुसऱ्या घटनेत रामेश्वर कॉलनी परीसरातील एकनाथ नगर येथे योगेश शांताराम पाटील (वय-28) रा.आडगाव,कासोदा ता.एरंडोल याने राहत्या घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. गेल्या आठ दिवसांपासून पत्नी माहेरी गेली असल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी सांगितले. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. एमआयडीसीचे स.फौ. अतूल वंजारी, अतुल पाटील अश्फाक शेख, मुकेश पाटील यांनी मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले. मयत योगेशच्या पश्चात पत्नी, लहान मुलगी असा परीवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content