जळगावचे सुपुत्र पवन बढे मोदींच्या ह्युस्टन दौर्‍याच्या प्रसिध्दीचे शिल्पकार !

Pawan Bade

जळगाव, प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा वैश्विक नेते अशी घडवणाऱ्या अमेरिकेतील ह्युस्टन येथील दौर्‍याच्या प्रसिध्दीची जबाबदारी शासकीय पातळीवर यशस्वीपणे पार पाडणारे आयएफएस अधिकारी पवन बढे हे जळगाव जिल्ह्यातील चिनावल येथील रहिवासी आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्याची मान संपूर्ण जगात उंचावली आहे. प्रत्येक जळगावकर नागरिकाला अभिमान वाटावा अशीच ही कामगिरी आहे.

 

पवन बढे यांचे कुटुंब चिनावल येथील रहिवासी असून त्यांचे काही नातलग आजही जळगाव येथेच राहतात. त्यांची युपीएससी परिक्षेच्या माध्यमातून भारतीय विदेश सेवा अर्थात आयएफएस मध्ये निवड करण्यात आलेली आहे. सध्या ते ओएसडी (प्रेस रिलेशन) या पदावर कार्यरत असून पंतप्रधानांच्या विदेश दौर्‍याच्या प्रसिध्दीचे काम पहातात. पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या ह्यूस्टन दौर्‍याच्या प्रसिध्दीची जबाबदारी यांचेकडेच होती, ती त्यांनी अगदी यशस्वीपणे पार पाडली आहे. खान्देशी मातीत जन्मलेल्या जळगावच्या या भूमिपुत्राचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Protected Content