रेल्वेच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

 

 

जळगाव : प्रतिनिधी । तालुक्यातील तरसोद येथील रामसिंग गोपाल राजपूत (७२) या वृद्धाचा रेल्वे धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

जळगाव तालुक्यातील तरसोद येथील रामसिंग गोपाल राजपूत यांचा तरसोद शिवारातील डाऊन लाईवरील खांब क्रमांक ४२८/१७ जवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची स्टेशन मास्टर यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ नशिराबाद पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलीस कर्मचारी रुपेश साळवे यांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला आहे. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Protected Content