दगडफेकीनंतर चिनावलमध्ये तणाव : पोलीस स्थानकासमोर ग्रामस्थांचा ठिय्या

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या चिनावल येथे किरकोळ कारणावरून सुरू असलेल्या भांडणाच्या प्रसंगी जोरदार दगडफेक करण्यात आल्याने वातावरण तणावग्रस्त करण्याची घटना रात्री घडली.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, चिनावल येथे काल रात्री आठच्या सुमारास महादेव वाड्याजवळ किरकोळ कारणातून वाद झाले. याप्रसंगी वानगल्ली, महादेव वाडा आणि महाजन वाडा या गल्ल्यांमध्ये काही समाजकंटनांनी जोरदार दगडफेक केली. यातच कुणी तरी डीपीला दगड मारल्याने अंधार पसरल्याने या गोंधळात भर पडली.

दरम्यान, यानंतर चिनावल गावातील शेकडो स्त्री-पुरूषांनी पोलीस चौकीच्या समोर ठिय्या मांडून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. परिस्थिती पाहता तात्काळी चिनावल येथे दंगा नियंत्रण पथकासह अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. पोलीस अधिक्षक एम. महेश्‍वर रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी चिनावल येथे भेट देऊन स्थिती जाणून घेतली. रात्री वातावरर नियंत्रणात आले होते. या संदर्भात सावदा पोलीस स्थानकात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. तर रात्री उशीरा उपविभागीय अधिकारी देवयानी यादव यांनी चिनावल येथे २० तारखेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

Protected Content