चाळीसगावच्या नायब तहसीलदाराला अटक

चाळीसगाव प्रतिनिधी | खटल्याच्या तारखेला हजर राहण्याबाबत न्यायालयाने दाेन वेळा समन्स बजावले. तरीदेखील हजर न झालेले चाळीसगावचे नायब तहसीलदार देवेंद्र सुरेश भालेराव यांना एसीबी पथकाने अटक केली.

२०१६ मध्ये देवेंद्र सुरेश भालेराव (वय ५२, रा. चंद्रलाेक अपार्टमेंट, महाबळ काॅलनी, जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कर्तव्यावर असताना अटक केली. तसेच गुन्ह्याच्या तपासात त्यांचे नाव निष्पन्न झाले हाेते. याप्रकरणी जळगाव शहर पाेलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार जिल्हा न्यायाधिश व अतिरिक्त सत्र न्यायाधिश यांच्या काेर्टात खटला सुरू अाहे. या खटल्याच्या तारखेला हजर राहण्याबाबत न्यायालयाने दाेनवेळा समन्स काढले हाेते. तरीही देवेंद्र भालेराव यांनी हजेरी टाळली हाेती. भालेराव हे त्यांच्या महाबळ काॅलनीतील चंद्रलाेक अपार्टमेंट येथील निवासस्थानापासून दुचाकीने जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना गणेश काॅलनीतील पेट्राेल पंपाजवळ अटक करण्यात अाली.

एसीबीचे उपअधीक्षक गाेपाळ ठाकूर, पाेलिस निरीक्षक नीलेश लाेधी, संजाेग बच्छाव, ईश्वर धनगर, मनाेज जाेशी, प्रशांत ठाकूर, नासीर देशमुख या पथकाने ही कारवाई केली.

Protected Content