जळगाव बॅग लिप्टींगच्या प्रयत्नातील चोरट्याला जमावाने बदडले; रामानंदनगर पोलीसांनी घेतले ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । एचडीएफसी बँकेतून २ लाख रूपये काढून पायी जात असलेल्या वृध्दाच्या हातातून पैश्यांची पिशवी लांबविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भामट्याला लोकांनी पकडून बेदम मारहाण केल्याची घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास काव्यरत्नावील चौकात घडली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अधिक माहिती अशी की, धनराज प्रेमराज पुरोहित (वय-६०) रा. शनीपेठ, जळगाव हे कामाच्या निमित्ताने काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेत दुपारी १ वाजता आले होते. बँकेतून दोन लाख रूपयांची रोकड काढली व पिशवीत रक्कम ठेवून पायी घरी जाण्यासाठी निघाले. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास मागुन चोरटा दुचाकीने मागून येवून पैश्यांची पिशवी हिसकविण्याचा प्रयत्न केला असता प्रसंगावधानाने धनराज पुरोहित यांनी हातातील पिशवी सोडली नाही. त्यामुळे दुचाकीवरील चोरटा हा खाली पडला. पुरोहित यांनी आरडाओरड केली असता परिसरातील नागरीकांनी धाव घेवून चोरट्याला पकडले व बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळतात रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाली. 

पोलीसांनी चौकशी केली असता राहूल उत्तम चौधरी (वय-२६) रा. मांडकी ता. भडगाव जि.जळगाव असे तरूणाचे नाव आहे. या तरूणाकडे (एमएच १९ सीक्यू ५००७) क्रमांकाची दुचाकी आहे. दुचाकीची नंबरप्लेट उलटी करून कोरी नंबरे प्लेट लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

घटनास्थळी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, दिपक बिरारी, पो.कॉ.रवी पाटील, रविंद्र चौधरी, हरीष डोईफोडे, अजय सपकाळे, संजय तडवी, किशोर पाटील, महेश पवार यांनी कारवाई करत चोरटा राहूल चौधरी याला उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. धनराज पुरोहित यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

Protected Content