शिवजयंती मिरवणुक; नियम मोडले म्हणून आमदारासह १५० जणांवर गुन्हा !

 

 

 चाळीसगाव: प्रतिनिधी ।  कोरोनामुळे  शासनाचे  शंभर जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याचे निर्देश असताना दिडशे जणांना  सोबत घेऊन मिरवणुक काढली व  नियमांचे उल्लंघन केल्याने  आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह दिडशे जणांवर आज शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला .

शहरात काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव वाढू लागला आहे. चाळीसगाव शहरातील रेल्वे स्थानक चौक ते सिग्नल चौक दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह दिडशेच्यावर कार्यकर्त्यांनी मिरवणुक काढली. आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह सौरभ  पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक चिरागुद्धीन शेख, दिपकसिंग राजपूत, बबन पवार, कैलास पाटील, नगरसेवक नितीन पाटील, कल्पेश पाटील, करण राजपूत, अनिकेत गवळी, भागवत पाटील, पंकज पाटील, प्रमोद वाघ, दर्शन शिंदे, शुभम पाटील, कुणाल पाटील, योगेश कुमावत व इतर दीडशे अज्ञातांवर  शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला  पोलिस कर्मचारी पंढरीनाथ पवार यांनी फिर्याद दाखल केली पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास स.पो.नि. किरण दांडगे करणार आहे.

 

Protected Content