स्वयंपाकाच्या गॅसची सिलिंडरमधून परस्पर चोरी ; कर्मचाऱ्यांची टोळी पकडली

 

पुणे : वृत्तसंस्था । मुख्य गोडाऊनमधून इतर गोडाऊनमध्ये गॅस सिलिंडर  नेऊन तिथे कनेक्टरच्या सहाय्याने एका सिलिंडरमधून एक ते दोन किलो गॅस दुसऱ्या रिकाम्या सिलेंडरमध्ये  भरून परस्पर चोरणारी गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांची टोळी पोलिसांनी पकडली आहे

 

सामाजिक सुरक्षा पथकाने २२ जणांना ताब्यात घेतलं असून ही कारवाई आज सांगवी परिसरात करण्यात आली

कारवाईमध्ये ३८१  गॅसच्या रिकाम्या आणि भरलेल्या टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधित आरोपी हे भैरवनाथ गॅस एजन्सी आणि कांकरिया गॅस एजन्सीमधील कर्मचारी असल्याचं समोर आलं असून  २५  लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सिसोदे, सोळंखे, पोलीस कर्मचारी कांबळे, बारकुले, करोटे, शिरसाठ, भारती, तिडके, लोंढे, असवले, मुठे, महिला पोलीस कर्मचारी जाधव, माने आणि गावडे, कचरे यांच्या पथकाने केली.

Protected Content