चोरीच्या गुन्ह्यात ३ वर्षांपासून पसार संशयित आरोपीला अटक

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीला जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी २९ मार्च रोजी सकाळी दहा वाजता संशयित आरोपी अतुल नाना पाटील (वय-२४, पथराड, ता.भडगाव) याला पथराड गावातून अटक केली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात दाखल असलेल्या संशयित आरोपी हा गेल्या ३ वर्षांपासून फरार झाला होता. या अनुषंगाने जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत संशयित आरोपी याला भडगाव तालुक्यातील पथराड गावातून शुक्रवारी २९ मार्च रोजी सकाळी १० वाजता अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय विजयसिंग पाटील, हवालदार लक्ष्मण पाटील, हवालदार अकरम शेख, हवालदार सुधाकर अंभोरे, नाईक राहुल पाटील आदींनी आरोपीला अटक केली. आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Protected Content