चाळीसगाव येथील टोळीप्रमुखासह एकजण जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपार

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी। जिल्हयांत टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना वचक बसावे म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चाळीसगाव तालुक्यातील दोघांना हद्दपार केले आहे. त्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून चौकशी करण्यात आली होती. चौकशीत त्यांचा सामाजिक उपद्रव निष्पन्न झाल्याने त्यांना जळगांव जिल्हयातुन ६ महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले आहे. अशी माहिती जनसंपर्क विभागाच्या वतीने शुक्रवार २९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता काढलेल्या प्रसिद्ध पत्रकांन्वये दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरकडील हद्दपार प्रस्ताव प्रमाणे गुन्हेगार टोळी प्रमुख जगदीश जगन्नाथ महाजन (वय-५१), दादू उर्फ विशाल जगदीश महाजन (वय-२३, दोघे रा. नेताजी पालकर चौक, चाळीसगाव) यांच्याविरुध्द चाळीसगाव पोलीस स्टेशनला खून, खुनाचा प्रयत्न, दंगल करणे, घातक हत्यार असे एकुण १० गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव उपविभाग यांनी केलेली आहे.

सदरचा हद्दपार प्रस्ताव हा चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोहेको विनोद भोई, पोना तुकाराम चव्हाण, महेंद्र पाटील अशांनी तयार करुन पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे कडेस सादर केला होता. डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावाचे चौकशीअंती गुन्हेगारांना ६ महिनेकरीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतुन हद्दपार आदेश पारित केलेले आहे. सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकांज पो. निरी. किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ यूनुस शेख इब्राहिम, पोहेको सुनिल पंडीत दामोदर यांनी पाहिले आहे.

Protected Content