Home Cities जळगाव सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांची गडचिरोलीला बदली

सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांची गडचिरोलीला बदली

0
50


 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील पोलीस अधीक्षक संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश सोमवारी काढण्यात आले. यामध्ये जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ.मुंढे यांची मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून तर जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा यांची गडचिरोली अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे.

जिल्ह्यात कार्यकाळ पुर्ण झालेल्या आयपीएस दर्जाच्या अधिकार्‍यांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची बदली झाली होती. मात्र त्यांना पदस्थापना देण्यात आली नव्हती. त्यांच्या जागी नागपूर लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची नियुक्ती झाली आहे.

दरम्यान, सोमवारी 7 नोव्हेंबर रोजी दुपारी शासानाने आयपीएस संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदलीचे व पदोन्नतीचे जम्बो गॅझेट प्रसिद्ध केले. यामध्ये जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची मुंबई शहर उपायुक्त पदी तर उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा यांची गडचिरोली अपर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.


Protected Content

Play sound