शेंदुर्णीत ‘त्या’ मंत्र्यांच्या विरोधात आक्रोश मोर्चा 

शेंदुर्णी ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या बद्दल अपशब्द वापरणारे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विरुद्ध आज मंगळवार दि.०८ रोजी सकाळी ९ वाजता शेंदुर्णी राष्टवादी व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यात शेंदुर्णी शहर शिवसेनेने सहभाग नोंदवला.

येथील आचार्य गजाननराव गरुड सभागृहापासून मोर्चाला सुरुवात झाली. त्यात “पन्नास खोके एकदम ओके”, “महिलांचा अवमान करणाऱ्या मंत्र्याचे करायचे काय – खाली डोके वर पाय”, असंस्कृत मंत्री हाय-हाय”,. अश्या विविध घोषणा देत महिलांनी बाजारपेठ दणाणून सोडली. मोर्चाचे रुपांतर सार्वजनिक वाचनालय चौकात सभेत रुपांतर झाले.

यावेळी मा.जि.प.सदस्या सरोजिनी गरुड यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळे यांच्या कार्याचा गौरव देशाच्या संसदेने पुरस्कार देऊन केलेला असतांना अशा महिलेचा जाहीर अवमान करणारे मंत्री अब्दुर सत्तार यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे काय हे तपासण्याची वेळ आली आहे. तसेच गुलाबराव पाटील जिल्हा पालकमंत्री असतांना जिल्ह्यात आलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी अपशब्द वापरतात हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे काय ? त्यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रवक्त्या छायाताई सावळे यांनी मंत्री अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांचा निषेध करतांना सदर मंत्री सत्तेच्या माजात राज्याची संस्कृती विसरले आहेत. म्हणून महिलांविषयी खालच्या भाषेत अपशब्द वापरून वेळोवेळी महिलांचा अनादर करीत आहेत. याचा जाहीर निषेध केला. यावेळी पुष्पाताई बारी व राजश्री गरुड यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी महिलांचा सार्वजनिक ठिकाणी वारंवार अनादर करणाऱ्या दोन्ही मंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.

यावेळी मा.जि.प.सदस्या सरोजिनी गरुड, राष्ट्रवादी प्रवक्त्या छाया सावळे, पुष्पाबाई बारी, आशा गुजर, न.प.गटनेत्या वृषाली गुजर, नगरसेविका चंद्रभागाबाई धनगर, मोहसीना खाटिक, भावना जैन, कुसुमबाई चौधरी, राधाबाई गुजर, सुनंदा माळी, नसिमबी पिंजारी, सलमाबी पिंजारी, राजश्री गरुड, मीराबाई जोहरे, रेखा अहिरे, माधुरी गरुड, सुभी तडवी, प्रिया शिवपूजे, भारती माळी, विद्या चौधरी, कविता गुरव, विजया गरुड, सोनाली वानखेडे, सविता धनगर, प्रतिभा जोहरे, अर्चना बारी, सुमनबाई भारुडे आदी महिला व राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य संजयदादा गरुड, मा.जि.प.सदस्य सागरमल जैन, मा.प.स.सदस्य सुधाकर बारी, शांताराम गुजर, डॉ.किरण सूर्यवंशी, जावा शेख, संजय सूर्यवंशी, अशोक बारी, मन्सूर पिंजारी, गजानन धनगर, योगेश गुजर, विजय चौधरी यांचेसह महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

Protected Content