मोदी-शहांनी ‘विक्रांत फाईल’ सुध्दा पहावी : संजय राऊत

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसंस्था | किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावावर कोट्यवधी रूपये हडप केले असून मोदी आणि शहांनी ही ‘विक्रांत फाईल’ सुध्दा पहावी व सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावावर कोट्यवधी रूपये जमा केले असले तरी याचे पुढे काय झाले हे कळले नाही. यामुळे विरोधकांवर कारवाई करणार्‍या केंद्र सरकारने सोमय्या यांची विक्रांत फाईल पाहून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील राऊत यांनी केली.

राऊत पुढे म्हणाले की, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे फार मोठे षडयंत्र सुरू आहे. या मोहिमेचे नेतृत्व किरीट सोमय्या हे करत आहेत. मात्र असे काहीही होऊ दिले जाणार नाही. सोमय्या हे महाराष्ट्रद्वेष्टे असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी याप्रसंगी केला आहे.

 

Protected Content