रंजन पाटील यांचे निधन

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रुग्णसेवक म्हणून ओळख असलेले तसेच टायगर ग्रुप बोदवड तालुका अध्यक्ष रंजन पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

रंजन भाऊ यांनी कोरोना काळात गोर गरीब लोकांना खूप मदत केली तसेच अनाथ बालके दुर्गम जंगलात राहणारे आदिवासी यांना कारोना चे बिकट परिस्थिती मध्ये आपल्या स्व खर्चाने भोजन पुरवले तसेच गोर गरीब म्हाताऱ्या लोकांना त्यांनी धान्य किराणा वाटप करून समाजात आपली वेगळीच ओडख निर्माण केली होती. तसेच त्यांनी स्वतः कोरोणा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचे काम केले आहे.  या घटनेने गावात शोककळा पसरली असून सर्व टायगर ग्रुप मध्ये सुधा शोककळा पसरली आहे त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच टायगर ग्रुप तर्फे प्रार्थना आहे.

Protected Content