दुबई येथे द्वितीय आंतरराष्ट्रीय योग संमेलन व योगासन स्पर्धेचे आयोजन 

 

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र योग परिषद आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे दिनांक चार व  पाच फेब्रुवारी २०२३ ला द्वितीय आंतरराष्ट्रीय योग संमेलन व विविध वयोगटातील योगासन स्पर्धा आयोजित होत आहे.

यासोबतच खास दुबईच्या लोकांकरिता मल्लखांबचे प्रात्यक्षिके सुद्धा सादर होतील. दिड दिवस संमेलनाचा व साडेतीन दिवस दुबई येथील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा कार्यक्रम असेल. मुंबई वरुन विमानाने जाणे येणे प्रवास खर्च उत्तम हॉटेलमध्ये निवास व भोजन व्यवस्था यासह स्थानिक प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी प्रवास व्यवस्था यासाठी एकूण शुल्क रुपये साठ हजार आकारण्यात आले आहे. दहा दिवसांच्या आत अग्रीम रक्कम तीस हजार रुपये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या पतपेढी बँकेमध्ये कॅश किंवा चेकद्वारे जमा करावयाचे आहे. ज्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे आहे त्यांनी खाली दिलेल्या बृहन महाराष्ट्र योग परिषदेच्या, खाते क्रमांक : 20095003193, IFSC Code -MAHB 0000559, MICR Code- 444014559 बँक ऑफ महाराष्ट्र रुक्मिणी नगर, अमरावती शाखेमध्ये ट्रान्सफर करावे.

ज्यांच्याकडे पासपोर्ट नाही त्यांनी लवकरात लवकर पासपोर्ट काढावा. आता पासपोर्ट जिल्हा किंवा तालुक्याच्या पोस्ट ऑफिस मध्ये मिळण्याची व्यवस्था  आहे. दुबई ला जाण्याची फ्लाईट दिनांक २ फेब्रुवारीला मुंबई विमानतळावरून सकाळी साडेदहा वाजता आहे. जाणाऱ्यांनी आठ वाजताच्या आत विमानतळावर पोहोचावे. दुबई वरून परत येण्याची फ्लाईट सहा फेब्रुवारीला रात्री साडेअकरा वाजता निघून मुंबई विमानतळावर सात तारखेला सकाळी सहा वाजता पोहोचेल. त्या दृष्टीने रेल्वेचे आरक्षण करावे. अधिक माहितीकरीता आयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण खोडस्कर मोबाईल क्र. ९४२३६२३९६७ यांच्याशी संपर्क साधावा.

Protected Content