तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्यकारी समिती सदस्यपदी अजित घारगे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया चे निरीक्षक राजकुमार कश्यप (उत्तर प्रदेश) व औरंगाबाद खंडपीठाचे वकील तथा निवडणूक अधिकारी विजय ढाकणे यांच्या निरिक्षणाखाली सन २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक प्रक्रिया २९ जानेवारी २०२३ रोजी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पार पडली.

त्यानुसार तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी डॉ. अविनाश बारगजे (बीड), उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम (गोंदिया), विनायक गायकवाड (मुंबई उपनगर), महासचिव मिलिंद पठारे, सचिव . सुभाष पाटील (रायगड), खजिनदार व्यंकटेश कररा (रत्नागिरी), निरज बोरसे (संभाजीनगर), अजित घारगे (जळगाव), सतिश खेमसकर (चंद्रपूर) यांची कार्यकारी समिती सदस्यपदी निवड झाली. सोबतच विविध समित्यांचे अंतर्गत छत्रपती पुरस्कार विजेते प्रविण बोरसे, वृषाली पाटील जोगदंड (नांदेड), राजेश महाजन (उस्मानाबाद), व भालचंद्र कुलकर्णी (सिंधुदुर्ग) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली तर लेखा छेत्री (यवतमाळ), कौशिक गरवालीया (ठाणे), विनायक एणपुरे (सांगली) यांची निवड झाली आहे.

अजित घारगे यांच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, खजिनदार सुरेश खैरनार, सौरभ चौबे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, अरविंद देशपांडे यांनी कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Protected Content