केळी पीक विम्यासाठी राष्ट्रवादी काढणार शिंगाडा मोर्चा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकर्‍यांना केळी पीक विम्याची थकीत रक्कम मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे शुक्रवारी भव्य शिंगाडा मोर्चा काढण्यात येणार आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने शिंगाडा मोर्चा काढण्याचे निश्‍चीत केले आहे. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर व चोपडा तालुक्यासह जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांचा हवामानावर आधारित फळ पिक विमा मंजूर पात्र शेतकर्‍यांना पैसे देण्यासाठी विमा कंपनी शासन दोन अडीच महीन्या पासुन टाळाटाळ करीत आहे.

या अनुषंगाने विमा कंपनी व शासनास भानावर आनण्या साठी दिनांक १३ऑक्टोबर शुक्रवार रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शिंगाडा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व शेतकर्‍यांनी शिंगाडे रूम्हणेवर गावाचे नाव लिहून आणावयाचे आहे. वरील तारखेला जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांनी एक दिवस कामधंदा बंद करून विम्याचे पैसे मिळण्यासाठी जातीने हजर रहावे आपल्या शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा व मोर्चा यशस्वी होवु नये म्हणुन शासनाने अपुर्ण व तुटपुंजी रक्कम देवुन शेतकर्‍यांना पैसै दिले हे भासविण्याचे काम शासनाने केले आहे.

आपल्या जिल्ह्याचे ८० हजार शेतकर्‍यांचे हक्काचे पात्र रक्कम मिळण्यासाठी जातीने हजर रहावे आपल्या शेतकर्‍यांना पैसे देण्यासाठी विमा कंपनी शासन टाळाटाळ करीत हे सिद्ध होते त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांना सरसकट विमा मिळण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन सोपान पाटील अशोक लाडवजारी यांनी केले आहे.

या मोर्चाचे नेतृत्व जिल्ह्यातील वरीष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे, अरूण भाई गुजराथी. माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, डॉ सतिश पाटील, मा. आ. अरूण पाटील, राजीव देशमुख, दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, महीला प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, किसान आघाडीचे सोपान पाटील, महानगराध्याक्ष अशोक लाडवंजारी आदींसह जिल्ह्याचे सर्व विभागाचे प्रमुख मार्ग दर्शन करणार आहेत.

भव्य शिंगाडा मोर्चा राष्ट्रवादी कार्यालयावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याची दिनांक १३ आक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी ठीक १वाजता मोर्चा निघणार आहे. यात शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content