यावल येथील बालसंस्कार विद्यालयात आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बाल संस्कार माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय बालिका दिन चर्चा सत्र व मौलिक मार्गदर्शनाने साजरा करण्यात आला.

यावल येथील बालसंस्कार विद्यालयात तालुका विधी समिती व यावल तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रमात मीना-राजू मंचा तर्फे एक चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. या चर्चा सत्रात माझे शरीर-माझा अधिकार,बॅड टचआणि गुड टच या विषयांवर शशिकांत वारूळकर व हेमंत फेगडे यांनी विद्यार्थी – विदयार्थीनीं यांना मौलिक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.एम.गर्गे यांनी ही विद्यार्थी-विदयार्थीनींना महत्वाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजू – मंचाचे सुगमकर्ता एस.डी.देशमुख, एल.व्ही.चौधरी, एन.ए.बारीआणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या सुन्दर अशा आंतरराष्ट्रीय बालिका दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.डी. देशमुख यांनी केले तर एल.व्ही.चौधरी यांनी सर्व उपास्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमची यशस्वी सांगता झाली.

Protected Content