कोरोना लॉकडाऊन : शाळा सुरु होण्याआधी फी घेतल्यास कारवाई : वर्षा गायकवाड

पुणे (वृत्तसंस्था) देशभरातील लॉकडाऊन संपेपर्यंत शाळांनी पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये, असे निर्देश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. तसेच ज्या शाळा आदेशाचे पालन करणार नाहीत, अशा शाळांवर कठोर कारवाईचा इशारा देखील दिला आहे.

 

एकिकडे राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे काही शाळांकडून पालकांकडे शाळा सुरु होण्याआधीच शुल्काची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पुढील शैक्षणिक वर्षाचे शाळांचे वर्ग सुरु झाल्याशिवाय शाळा व्यवस्थापनाने फी मागू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. दरम्यान, ज्या शाळा आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

Protected Content