डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राज्यस्तरीय पुरस्काराने नूर खान इलिहास सन्मानित

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आदिलशाह फारुकी या जळगाव जिल्ह्यातील नामांकित संस्थेच्या वतीने यंदाचा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा माहीजी ता. पाचोरा येथील उपशिक्षक नूरखान इलियास खान यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

शैक्षणिक समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम दि. ८ मे रविवार रोजी अल्पबचत भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या ठिकाणी पुरस्कार संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार होते. तसेच मनियार बिरादरी जि.अध्यक्ष फारूक शेख, मजीद जकरिया, डॉ. पाकिजा पटेल, फारूक पटेल, व संस्थाचे अध्यक्ष फारुक शाह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल कुरंगी, सामनेर केंद्रप्रमुख सह सर्व शिक्षक, शिक्षिका कर्मचारी वृंद यांच्याकडून अभिनंदनचा  वर्षाव होत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!