अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दहीगाव येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील दहिगाव येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार ८ मे रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळूवन नेले आहे. अल्पवयीन मुलीची नातेवाईक व मैत्रिणींकडे शोधाशोध केली असता कुठेही आढळून आली नाही. रात्री ८ वाजता यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून कुणीतरी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले आहे अशी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!