राष्ट्रीय परिषदेत गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांचा सत्कार

WhatsApp Image 2019 11 01 at 11.51.27 AM

जळगाव, प्रतिनिधी | सिंहगड इंस्टिट्यूट सोलापूर येथे सर फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीयस्तर एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स-२०१९ मध्ये जिल्हा परिषद जळगाव येथील शिक्षण विस्तार अधिकारी तथा रावेर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीयस्तर एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स या  राष्ट्रीय परिषदेत राज्यातील १०५ शिक्षकांनी शैक्षणिक नवोपक्रम सादर केले. शिक्षणातील नवीन प्रवाह, सरकारी शाळा सक्षमीकरण, स्मार्ट स्कुलींग या विषयावर चर्चासत्र सोबतच विविध उपक्रम या परिषदेत घेण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून सर फाऊंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणे येथील शास्त्रज्ञ विपुल शहा, गुजरात येथील शिक्षणतज्ञ डॉ. भावेश पंड्या, बाळासाहेब वाघ , सिध्दाराम माशाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विजय पवार यांनी मुक्ताईनगर , भुसावळ, रावेर या तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करत असतांना अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या सत्काराबद्दल शिक्षणाधिकारी बी जे पाटील, उपशिक्षणाधिकारी डॉ. डी. एम. देवांग यांनी अभिनंदन केले असून शिक्षकवर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Protected Content