हॉस्पिटल समोरून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणेश कॉलनीतील सरोदे हॉस्पिटल जवळून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत प्रकाश येवले (वय-३८) रा. बजरंग बोगद्याजवळ, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मेडीकल दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतो. मेडीकलच्या कामाच्या निमित्ताने प्रशांत येवले हो शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता दुचाकी (एमएच १९ एयू ५८७९) ने कामाच्या निमित्ताने गणेश कॉलनीतील सरोदे हॉस्पिटल जवळ आला होता. दुचाकी हॉस्पिटलच्या समोर पार्किंगला लावली होती. दुपारी १२ वाजता काम आटोपून दुचाकी जवळ आले तर दुचाकी जागेवर दिसून आली नाही. अखेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वागळे करीत आहे.

Protected Content