राष्ट्रवादी कॉंग्रेसचा महागाई, बेरोजगारीवर त्वरित तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा

 

जळगाव प्रतिनिधी । मागील सात वर्षात महागाई, बेरोजगारी प्रचंडप्रमाणात वाढली असून इंधनाचे भाव देखील वधारले असल्याने वाहतूक खर्च देखील वाढला आहे. देशातील महगाई, बेरोजगारीवर त्वरित तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी कॉंग्रसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात  आला आहे. 

निवेदनाचा आशय असा की, मागील सात वर्षात महागाई, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कोणालाच परवडणार नाही एवढे वाढले आहे. इंधनाचे भाव वाढल्याने परिणामी वाहतुकीचा खर्च देखील वाढला आहे. व अन्नधान्य, दैनंदिन वापराच्या वस्तू या सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. तसेच अनेक उद्योग कारखाने संस्था बंद पडल्या आहेत. करोडो लोक बेरोजगार झाले आहेत. 100 हून अधिक दिवस शेतकरी आंदोलनाला पूर्ण झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भाग असो वा शहरी भाग सर्व सदस्य हजारो खड्ड्यांनी भरलेल्या आहेत. ते प्रचंड पाहायला मिळतात. अनेक घरात, कार्यालयात धुळीचे थर साचले आहेत. कुणाच्याच मागण्या समजून घेऊन त्यातून माग काढण्यात अजूनही मोदी सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे उद्योजक लोकं शेतकरी समज लोकांमध्ये प्रचंड आक्रोश दिसून येत आहे. या सर्वच बाबी गंभीर असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेची जीवन अत्यंत कठीण व असे झाले आहे. यावर केंद्र सरकार यांनी त्वरित तोडगा काढावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. रवींद्र भारदे यांना निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील , युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे, पराग पाटील, विकास पवार आदी उपस्थित होते.   

 

Protected Content