महाशिव आघाडीच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा

sena congress bjp

मुंबई प्रतिनिधी । महाशिव आघाडीच्या नेत्यांच्या आजच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली असून सरकार स्थापनेसाठी अनुकुलता दर्शविण्यात आली आहे.

काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर आज सायंकाळी महाशिव आघाडीतील दोन्ही काँग्रेससह शिवसेनेचे नेते उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, पृथ्वीराज चव्हाण आदींची उपस्थिती होती. प्रदीर्घ काळ बैठक झाल्यानंतर या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली असून याची माहिती तिन्ही पक्षश्रेष्ठींना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, १७ नोव्हेंबर रोजी दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होणार असून यात सत्ता स्थापनेबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे.याच दिवशी दिवंगत शिवनेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन असून याच दिवशी महाशिव आघाडीची अधिकृत घोषणा होऊ शकते.

दरम्यान, महाशिव आघाडीच्या नेत्यांच्या या बैठकीत तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची देहबोली ही अतिशय सकारात्मक दिसून आली असून यामुळे या आघाडीचे सरकार बनण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Protected Content