‘त्या’ तरुणीवर बलात्कार झालाच नाही : पोलिसांचा दावा

नवी दिल्ली- हाथरसमधील प्रकरणाबाबत देशभर प्रक्षोभ सुरु असतांना “त्या” पीडित तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 

हाथरसमधील १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार झालेला नाही. तिचा मृत्यू घशातील दुखापत आणि त्यामुळे आलेल्या झटक्याने झाला आहे, असा दावा उत्तर प्रदेशचे अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी केला आहे. 

पोलिस अधिकारी प्रशांतकुमार म्हणाले की, काही लोक सामाजिक सौहार्द बिघडवण्यासाठी आणि जातीय हिंसाचार भडकवण्यासाठी वस्तुस्थिती चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत. घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला होता. आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचं तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. आपल्याल फक्त मारहाण झाल्याचा आरोप तिने केला होता. हाथरस प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. आग्रा येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालातही तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचं सांगण्यात आलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

हे एक गंभीर प्रकरण आहे. सरकार आणि पोलिस महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली आहे, असंही एडीजी प्रशांतकुमार म्हणाले.

Protected Content