आकाशवाणी चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आकाशवाणी चौकात एका रुग्णालयासमोर रस्त्यावर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जखमी झाल्याची घटना घडली होती. या अपघातप्रकरणी दोन दिवसानंतर रामानंदनगर पोलिसात ट्रृकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील सरदार नगर येथील कुणाल शाम बिऱ्हाडे वय ३० हा तरुण हे गुरुवार, २१ जुलै रोजी शहरातील आकाशवाणी चौकातून त्याच्या एम.एच १९ एडब्लू ९९२० या क्रमांकाच्या दुचाकीवरुन जात होते. यादरम्यान एका रुग्णालयातसमोर भरधाव ट्रकने बिऱ्हाडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील कुणाल हा जखमी झाला. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. अपघानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाला. दरम्यान याप्रकरणी दोन दिवसानंतर कुणालचे वडील शाम मुकूंद बिऱ्हाडे यांच्या फियार्दीवरुन अज्ञात ट्रकचालकाविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

Protected Content