आर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा येथे बालदिन साजरा

WhatsApp Image 2019 11 14 at 9.09.06 PM

चोपडा, प्रतिनिधी | यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा येथे आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने बाल दिवस साजरा करण्यात आला.

आर्किड इंटरनॅशनल स्कूल  येथे बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्राचार्या मिस परमेश्वरी कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी पं. जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना चाच्या नेहरूंच्या जीवनावर आधारित लघु कथा दाखवण्यात आली. आजचा दिवस बाल दिवस म्हणून का साजरा करतात त्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी बाल दिनाच्या प्रसंगी रंगीबेरंगी कपडे परिधान केले होते. तसेच बाल गीतांवरती नृत्य करून सर्वांनी खूपच आनंद घेतला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content