शिक्षक दिन उत्साहात साजरा

खामगाव प्रतिनिधी | येथील ऍन्स विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, ५ सप्टेंबर शिक्षक दिन सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा दिवस शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने खामगाव येथील सेंट अँन्स शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर रत्नामेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वप्रथम सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या फोटोला हार अर्पण केला.

यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आवश्यक अंतर ( सोशल डिस्टन्स ) ठेवून सगळ्या सूचना चे पालन यावी कार्यक्रमाच्या वेळेस करण्यात आली. कार्यक्रमाच्या करिता शाळेतील सर्व शिक्षक व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांनी स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले.

यामध्ये वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तर, वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर केलेले विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे व शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले..शाळेच्या मुख्याध्यापिका यांनीसुद्धा गुरु आणि शिक्षक यांच्या बद्दल माहिती सांगितली. सर्वात शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!