महिलेचा मर्डर : पतीचे पत्नीवर विळ्याने वार

चोपडा प्रतिनिधी | कौंटुंबिक वादातून पतीने पत्नीवर विळ्याने वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे.

घरगुती वादातून येथे एका महिलेचा खून झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातल्या फुले नगरातील रहिवासी संजय पुंजू चव्हाण (वय ४८) याचे रविवारी सायंकाळी पत्नी मीराबाई चव्हाण हिच्यासोबत वादातून भांडण झाले. याप्रसंगी त्याने संतापात आपल्या पत्नीवर विळ्याने वार केले. यामुळे तिच्या मांडीला जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाले.

जखमी अवस्थेत मीराबाई चव्हाण (वय ४०) यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मीराबाईंचा मृत्यू झाला. संबंधीत प्रकरणी या दाम्पत्याचा मुलगा सागर चव्हाण याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भयंकर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!