रावेर प्रतिनिधी | पाल येथे गेलेल्या जळगावच्या तरूणांमधील दोन जण पाण्यात बुडाले असून रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.
याबाबत वृत्त असे की, अक्षय उर्फ उज्ज्वल राजू पाटील (वय २४, रा. खेडी) या तरूणाचा वाढदिवस असल्याने त्याचे सर्व मित्र हे रावेर तालुक्यातील पाल येथे गेले होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास हे तरूण पाण्यात पोहण्यासाठी उतरले. यात उज्ज्वल पाटील आणि त्याचा एक मित्र हे पाण्यात बुडाले. यामुळे भेदरलेल्या त्याच्या मित्रांनी तातडीने ही माहिती घरच्यांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, या तरूणांच्या नातेवाईकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून त्यांचा शोध सुरू केला. रात्री उशीरापर्यंत या दोन्ही तरूणांचा शोध घेण्यात आला असता ते मिळून आले नाहीत.