धक्कादायक ! मतदान केंद्राजवळ मृत्यू

रायगढ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही तिसऱ्या टप्यासाठी ११ मतदारसंघात मतदान सुरू आहे. मतदानसाठी तरूणांची मोठी गर्दी दिसत आहे. मात्र असे असताना रायगड मतदारसंघातील असणाऱ्या महाड येथे धक्कादायक घटना घडली आहे. मतदान करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीच मतदान केंद्राजवळच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

प्रकाश चिनकटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते महाड तालुक्यातील दाभेकर कोंड येथील रहिवासी असून दाभेकर कोंड येथील मतदान केंद्रात मतदान करण्यसाठी सकाळी ९ वाजता घरातून बाहेर निघाले होते. त्यांच्यासोबत गावातील काही लोकही होते. मतदान केंद्राच्या जवळ पोहचता अचानक त्यांना चक्कर आले. त्यामुळे ते रस्त्यावरच कोसळले. त्यांना रूग्णालयात दाखल केले असता तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पण त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. रायगड मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते असा सामना रंगला आहे. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.

Protected Content