वंचितच्या उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक

अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अहमदनगरमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठीच्या मतदानाआधी मध्यरात्री धक्कादायक घटना घडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्कर्षा रूपवे यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. अकोले तालुक्यातील चितळवेढे गावात ही घटना घडली आहे. अंधाराचा फायदा घेऊन हल्ला करणारे पळून गेले. या हल्ल्यात उत्कर्षा रूपवते यांना काहीही झाले नाही, परंतू त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.

शिर्डी लोकसभेतील वांचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते या त्यांचा प्रचार दौरा आटोपून परत येत होत्या. रात्री 10 वाजता प्रचार सभा आटोपून त्या अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ आल्या. यावेळी अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला. हल्ला करणारे दोन जण असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वंचित आघाडीचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक पांडूरंग कावळे, कर्मचारी अशोक गाडे, विजय फटांगरे, शिंदे आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. त्याचवेळी वंचित आघाडीचे कार्यकर्ते आले. या घटनेमुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांना पोलिसांनी आणि उत्कर्षा रुपवते यांनी शांत केले.

Protected Content