धक्कादायक : दगडाने मारहाण करून तरूणाला लुटले; २ लाख ३२ हजारांची रोकड घेवून तिघे पसार

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिला बचत गटाचे पैसे वसूल करून जळगावकडे निघालेल्या तरूणाच्या दुचाकीला एकाने कट मारला. त्यात तरूणा खाली पडल्याने अज्ञात तीन जणांनी दगडाने मारहाण करून त्यांच्याजवळील २ लाख ३२ हजार रूपयांची रोकड व महत्वाची कागदपत्रे जबरी हिसकावून जबरी लांबवल्याची खळबळजनक घटना सोमवारी ६ मे रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता अज्ञात तीन जणांवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती अशी की, पवन राजू मारग वय-२७, रा. देवकर नगर, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून महिला बचत गटाचे पैसे वसुलीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान सोमवारी ६ मे रोजी महिला बचत गटाचे पैसे वसूल करून ते जळगावला येण्यासाठी निघाले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वराड गावाच्या हायस्कूल जवळ रस्त्यावरून जात असताना मागून एका बाईकने कट मारला. त्यामुळे ते खाली पडले, दरम्यान त्यासोबत इतर दोन जण त्या ठिकाणी आले. यावेळी अज्ञात ३ जणांनी दगडाने पवन यांना मारहाण करून त्यांच्या जवळील २ लाख ३२ हजार रुपये रोकड पिशवीतील बचत गटाचे पावती पुस्तक तसेच संबंधित कागदपत्रे असलेली पिशवी जबरी हिसकावून चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर पवन मारग यांनी रात्री ११ वाजता धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात तीन जणांविरोधात धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ हे करीत आहे.

Protected Content