नाशिक हादरलं : रागाच्या भरात भाच्याने मामाला संपवलं !; जाणून घ्या मागचे कारण ..

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । नाशिक शहरातील पंचवटी परिसरात एका किरकोळ कारणावरून रागाच्या भरात भाच्याने आपल्या सख्ख्या मामाला जमीनीवर आपटून जवळच असलेल्या झाडाची कुंडी छातीत मारून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मच्छिंद्र माणभाव असे हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर बाबुलाल सोमा गावित असे मृत्यू झालेल्या मामाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाबुलाल सोमा गावित हे गेल्या दोन महिन्यांपासून पंचवटीतील हिरावाडी परिसरात आपला भाचा मच्छिंद्र माणभाव याच्याकडे राहत होते. शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास ‘तुझ्या मुलाच्या पायाला चटके लागले आहेत, त्याला दवाखान्यात दाखवायला तुझ्याकडे पैसे नाहीत. पण दारू प्यायला पैसे आहेत’ असे मामा बोलल्याचा राग मच्छिंद्र  याला आला. रागाच्या भरात मच्छिंद्र याने घरातील पलंगावर बसलेल्या आपल्या मामाला खाली जमिनीवर आपटले. तसेच प्लास्टिकची झाडाची कुंडी मामाच्या छातीत मारुन फेकली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने मामाचा काही वेळातच मृत्यू झाला.

धक्कादायक बाब म्हणजे, मच्छिंद्र याने मामाला संपवल्यानंतर मृतदेह शुक्रवारी दिवसभर घरातच ठेवला होता. पोलीसांकडे तक्रार देण्यासही कोणी पुढे येत नव्हते. अखेर शनिवारी पोलिसांनी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि रविवारी शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर नाशिकमधील पंचवटी पोलिसांनी भाचा मच्छिंद्र माणभावविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला बेड्या ठोकल्या. पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.

Protected Content