घसा खरडून तथ्यहीन घोटाळे काढणाऱ्या सोमय्यांवर अन्याय- मिटकरींची टीका

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यातील अनेक तथ्यहीन घोटाळे काढून ते घसा खरडून जनतेसमोर मांडण्यात तरबेज असलेले भाजपचे किरीट सोमय्यांवर एक प्रकारे जनता नाराज आहे त्यामुळे भाजपने तिकीट दिले नाही, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे आ. अमोल मिटकरी यांनी ट्वीट करीत केली आहे.

गेले कित्येक महिने राज्यातील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या राज्यसभेसाठी उमेदवारी मिळेल या आशेवर महाविकास आघाडीतून कोणतेही तथ्य नसलेले आरोप करीत अनेक घोटाळे बाहेर काढले. अनेक आंदोलने केलीत, दौरे, पत्रकार परिषदा घेत टीकेची राळ उठवली, पण हाती काही आले. भाजपने मात्र त्यांच्या ऐवजी विदर्भातून दोन आणि कोल्हापुरातून एक असे तीन उमेदवार दिले. आणि किरीट सोमय्यांना तोंडघशी पाडले. अशी उपहासपूर्ण आणि खोचक टीका राष्ट्रवादीचे मिटकरीनी केली आहे.

Protected Content