पहूर येथे एकावर चाकू हल्ला

पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूरपेठ येथे रात्री एका व्यावसायिकावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

 

पहूरपेठ ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलात दुकान असलेल्या एका व्यावसायिकावर एकाने चाकूहल्ला केल्याची घटना काल रात्री घडली. पहूरपेठ ग्रामपंचायतीच्या  व्यापारी संकूलात राहूल नाना भोंडे यांचे दुकान असून किरकोळ वादावरून एका गावगुंडाने राहूल भोंडे यांच्यावर अचानक चाकूहल्ला केला. यात भोंडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

 

या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यात राहूल भोंडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Protected Content