मुक्ताईनगरात अवैध गौण खनिज उत्खनन जोमात : प्रशासन निद्रीस्त

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तालुका प्रशासनाबद्दल फार मोठ्या प्रमाणात नाराजी व असंतोष आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, सध्या मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज वाहतुक सुरू असून यावर कधी कारवाई होणार हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने होत आहे असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहेत. तालुका प्रशासनाचे या अवैध गौण खनिज वाहतुकीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा शहरात आहे. तालुका प्रशासनाच्या या अवैध गौण खनिज वाहतूक कडे दुर्लक्ष झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे सर्रास उल्लंघन होत असून शासनाचा दरमहा कोट्यावधींचा महसूल या अवैध गौण खनिज वाहतुकीमुळे बुडवला जात आहे.

दरम्यान, शासकीय अधिनियमानुसार गौण खनिज वाहतूक ही फक्त सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत करणे बंधनकारक असून रात्रभर होणार्‍या या अवैध गौण खनिज वाहतुकीमुळे महसूल अधिनियमाचे उल्लंघन करणार्‍या अवैध गौण खनिज वाहतूकदारांना पाठीशी घालणार्‍या तालुका प्रशासनावर जिल्हा प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न तालुक्यातून विचारला जात आहे.

Protected Content