रोहिणी खडसेंचे शरद पवारांना स्पेशल गिफ्ट !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आज जळगावात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एक स्पेशल गिफ्ट प्रदान केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी अमळनेर येथील ग्रंथालय सेलचे अधिवेशन आटोपून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. या ठिकाणी शरद पवार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी फ्लेमिंगो पक्षाचे प्रतिमा असलेल्या फोटो फ्रेम भेट दिल्या. हे फोटो स्वतः रोहिणी खडसे यांनी छायाचित्रीत केलेली आहेत.

बारामती पासून जवळ असलेल्या भिगवण परिसरात उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये हिवाळ्यात दरवर्षी परदेशी फ्लेमिंगो पक्षी स्थलांतरित होत असतात. रोहिणी खडसे यांनी गेल्या वर्षी या ठिकाणी भेट देऊन फ्लेमिंगो पक्षांची फोटोग्राफी केली होती. त्यातील निवडक फोटोंची फ्रेम बनवून रोहिणी खडसे यांनी ते शरद पवार यांना भेट दिले.

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेती शैक्षणिक ,औद्योगिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या बारामती परिसरातील संस्थांना भेटी देण्यासाठी बारामती येथे गेले होते. यामध्ये बारामती ऍग्रीकल्चर ट्रस्ट अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे जैव तंत्रज्ञान विभाग प्रयोगशाळा, ऑटोमेशन विभाग,माती परीक्षण प्रयोगशाळा, भाजीपाला – टिश्यू कल्चर लॅब, रोपवाटिका, मत्स्य, मधुमक्षिका पालन विभाग व दुग्धशाळा विभाग अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती द्वारा संचलित शारदाबाई पवार महिला महाविद्यालय तसेच अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती द्वारा संचलित अप्पासाहेब पवार सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट एज्युकेशन सेंटर, इनोव्हेशन इनक्युबेशन सेंटर बारामती ,पंचायत समिती बारामती, टेक्सटाईल पार्क बारामती व इतर संस्थांना भेट दिल्या. शरद पवार यांच्या मार्गदर्शना खाली या परिसराचा झालेला कायापालट अनुभवला.

फेब्रुवारी महिना हा हिवाळ्याची वेळ असल्या कारणाने बारामती परिसरात परदेशी फ्लेमिंगो व इतर पक्षांचे आगमन झालेले असते. खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या सुचनेनुसार बारामती पासून जवळच असलेल्या उजनी धरणाच्या यशवंत सागर जलाशयाच्या बॅकवॉटरच्या काठावर वसलेल्या कुंभारवळण (भिगवण) येथे फ्लेमिंगो पक्षी निरीक्षणासाठी भेट दिली होती. हिवाळ्यात अनेक परदेशी पक्षी येथे स्थलांतरित होत असतात यात प्रामुख्याने फ्लेमिंगो पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.

विस्तीर्ण जलाशयाच्या भिगवण परिसरातील कुंभारवळण भागात उथळ पाणी व दलदलयुक्त बेटामुळे पक्षांसाठी मुबलक प्रमाणात अन्न व घरट्यां साठी झाडे झुडपे उपलब्ध असल्या कारणाने येथे येणार्‍या पक्षांची संख्या मोठी आहे यामध्ये प्रामुख्याने फ्लेमिंगो पक्षांचे प्रमाण जास्त आहे. सकाळच्या रम्य वातावरणात या पक्षांना पाहणे हा मोठा विलक्षण अनुभव असतो. हा पक्षी आकाशात उडत असताना अग्नीसारखा रंग दिसतो. म्हणून त्याला अग्निपंख सुद्धा म्हटले जाते. भीमेच्या काठावर निसर्गाचा अपूर्व मेळ, पक्षांच्या मंजुळ मंगलमय किलबिलाट येथे अनुभवायला मिळतो. हे अविस्मरणीय आनंदाचे क्षणफोटोंच्या रुपाने कॅमेरा मध्ये कैद केले होते. या फोटोंची फ्रेम बनवून आज शरद पवार यांना भेट देताना आनंद होत असल्याचे रोहिणी खडसे म्हणाल्या.

Protected Content