दिवाळीत चोरट्यांचा धुमाकुळ; बंद घर फोडून दीड लाखांचा ऐवज लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळ्यातील मंगलमूर्ती नगरातून बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ३५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता समोर आली. याप्रकरणी बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जगदीश काशिनाथ पाटील (वय-४३) रा. मंगलमूर्ती नगर, पिंपळा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते माजी सैनिक आहेत दीपावलीच्या निमित्ताने १३ नोव्हेंबर रोजी ते परिवारासह घराला कुलूप लावून गावाला गेले होते. दरम्यान चोरट्यांनी हीच संधी साधत बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख ३५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता सुमारास उघडकीला आला. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरात सर्व सामान अस्तव्यस्त पडलेला दिसून आला. बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जगदीश पाटील यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.

Protected Content