परतीच्या प्रवासासाठी बस महामंडळाच्या ऑनलाईन आरक्षणाला प्रतिसाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  दिवाळी सण साजरी करण्यासाठी आपल्या गावी आपल्या कुटुंबात आलेले कुटुंब आता परतीच्या मार्गावर असल्याने  परतीच्या प्रवाशांसाठी विशेष बसेस यावल बसस्थानकातून सोडण्यात येत आहे. या माध्यमातून ऑनलाईन आरक्षणाला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  प्रवाशांनी आपला प्रवास सुरक्षीत व सुखद होण्यासाठी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावल आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे.

यावल परिसरातील प्रवाशी बांधवांना येथील एसटी आगारातून दिवाळी परतीच्या हंगामात प्रवाशांच्या खास सवलती करिता संध्याकाळची यावल पुणे जादा बस दिनांक १५ ते १९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान  संध्याकाळी १९ वाजता सुरू करण्यात आली आहे. सदर बसचा मार्ग यावल -भुसावळ -जामनेर -छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे असा राहील व प्रवाशांना सदर गाडीचे आरक्षण ऑनलाइन रिझर्वेशन करता येईल तसेच यावल आगारातही आरक्षण बुकिंग सुरू झालेली आहे  तरी प्रवाशांनी आपल्या आवडत्या तालपरी बस ने सुरक्षीत प्रवास करावा असे आवाहन एसटी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे.

प्रवाशांच्या माहितीसाठी इतर नियमित वेळा यावल भुसावळ जामनेर पुणे :

८, ९, १९  वाजता ( जादा ) यावल भुसावळ जळगाव पुणे ०९.३०, १६ .२० वाजता, यावल कल्याण ०८.१५, यावल उधना ८.३०, यावल वापी ७.१५, यावल बडोदा ६.४५, यावल-लातूर ०८.००, यावल माहूरगड -०७.१५, यावल शिर्डी १२.३०, यावल-अकोला ६.३० असे लांब पल्यांच्या एसटी बसेसचे वेळापत्रक आहे.  यंदा यावल आगारास सणा निमित्ताने आलेल्या प्रवाशांकडुन मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 

Protected Content