मोठी बातमी : रखवालदाराचा खून करणाऱ्या दोघांना अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव तालुक्यातील वावडदा ते म्हसावद दरम्यान वावडदा शिवारात शेतात अज्ञात दरोडेखोरांनी जबरी दरोडा टाकण्याचा प्रयत्नात एका रखवालदार पांडुरंग पंडित पाटील (वय ५२, रा. बिलवाडी) याचा लोखंडी वस्तूने निर्घूण खून केल्याची घटना बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना मध्यप्रदेशातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.  पवन बहादीर बारेला (वय-३०) रा. बाघाड ता. राजापूर जि. बडवाणी आणि बावरसिंग शोभाराम बारेला (वय-२८) रा. सालीकल ता. राजापूर जि.बडवाणी मध्यप्रदेश अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथीलच रहिवासी ईश्वर मन्साराम पाटील यांचे वावडदा ते म्हसावद दरम्यान असणाऱ्या शेतामध्ये पांडूरंग पंडीत पाटील (वय-५२, रा. बिलवाडी ता.जि.जळगाव) हे झोपण्यासाठी गेले होते. मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्री दोन्ही संशयित आरोपी पवन बहादीर बारेला (वय-३०) रा. बाघाड ता. राजापूर जि. बडवाणी आणि बावरसिंग शोभाराम बारेला (वय-२८) रा. सालीकल ता. राजापूर जि.बडवाणी हे दोघे शेतात आले. त्यावेळी शेतातून ट्रॅक्टर चोरी करण्यासाठी आले होते. त्यावेळी झोपलेले पांडूरंग पंडीत पाटील हे जागे झाली. त्यांनी ट्रॅक्टर चोरीला विरोध केला होता. त्यावेळी पवन बारेला आणि बाबवसिंग बारेला या दोघांनी लोखंडी डाबर पांडूरंग पाटील याच्या डोक्यात टाकून खून केला. त्यानंतर ते ट्रॅक्टर घेवून पसार झाले. दरम्यान, चोरी केले ट्रॅक्टर देखील रस्त्याने बंद पडले. त्यामुळे दोघेजण दुचाकीने पसार झाले. या खूनाबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह त्यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे मध्यप्रदेशातून  पवन बहादीर बारेला (वय-३०) रा. बाघाड ता. राजापूर जि. बडवाणी आणि बावरसिंग शोभाराम बारेला (वय-२८) रा. सालीकल ता. राजापूर जि.बडवाणी यांना अटक केली. ही कारवाई एपीआय निलेश पाटील, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकॉ जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भारत पाटील, संदीप सावळे, ईश्वर पाटील, लोकेश माळी यांनी ही कारवाई केली.

Protected Content