भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष डॉ. पाटील यांची ‘आई’ हॉस्पिटलला सदिच्छा भेट

WhatsApp Image 2019 06 30 at 2.47.17 PM

चाळीसगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ.संजीव पाटील यांनी आज चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव व आई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ .विनोद कोतकर यांचे आई हॉस्पिटल येथे सदिच्छा भेट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला डॉक्टरांनी गरोदर मातांची मोफत तपासणी करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आई हॉस्पिटलमध्ये नोव्हेंबर २०१६ पासून दर महिन्यात ९ तारखेला आजपर्यंत ११८० महिलांची मोफत बाह्यरुग्णतपासणी करण्यात आल्याची माहिती डॉ.विनोद कोतकर यांनी जिल्हाध्यक्ष डॉ.पाटील यांना दिली. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड झालेबद्दल डॉ.संजीव पाटील यांचा डॉ.विनोद कोतकर यांनी शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून आई फाऊंडेशनच्या वतीने सत्कार केला. यावेळी चाळीसगाव वकील असोशिएनचे माजी अध्यक्ष ऍड. .नानकर उपस्थित होते.

Protected Content