अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीविरोधात तक्रार

मुंबई- सध्या टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय शो असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ आणि या शोचे होस्ट बिग बी अमिताभ बच्चन अडचणीत सापडले आहेत. शोच्या एका एपिसोडमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून वाद निर्माण झाला आहे. 

कौन बनेगा करोडपती शोच्या एका एपिसोडमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायींनी कोणत्या धर्मग्रंथांच्या प्रति जाळल्या होत्या?’ असा प्रश्न स्पर्धकाला विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय देण्यात आले होते. यावरून अनेकांनी सोनी टिव्ही वाहिनी व अमिताभ यांच्यावर टीका केली. या मुद्द्यावरून हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे शो चे सूत्रसंचालक, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि केबीसी कार्यक्रमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या एपिसोडमध्ये सामाजिक कार्यकर्ते बेजवाडा विल्सन आणि अभिनेते अनूप सोनी अतिथी म्हणून आले होते.

 

Protected Content